ट्रेलरवरून वाटतो त्यापेक्षा हा पिक्चर बराच वेगळा आहे आणि अनेक अनपेक्षीत वळणे घेत सुरूवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. सुमित राघवन आणि इरावती हर्षे यांची कामं अगदी टॉप आहेत, आणि नाना विषयी काही बोलायची गरजच नाही (जशी कधीच नसते). अजय देवगणला फक्त एकच डायलॉग असल्याने त्याचं मराठी तपासता आलं नाही, पण बऱ्याच दिवसांनी अस्सल (सीरीयल्समधली नकली नव्हे) गावरान मराठी ऐकायला मिळाली.
No comments:
Post a Comment