Saturday, May 10, 2014

दाद

पुलंची पुस्तकं शाळेत असल्यापासून मी वाचतोय, पुलंनी वाचलेल्या पुस्तकांबद्दलचं एक पुस्तक अलीकडे वाचनात आलं. 'दाद'. वेळोवेळी पुलंनी विविध पुस्तकांना जी दाद दिली ती इथे संग्रहित करण्यात आली आहे. त्यात काही प्रस्तावना आहेत, नवोदित लेखकांना पुस्तक आवडल्याची पोचपावती म्हणून लिहिलेली पत्रं आहेत, काही प्रकाशन प्रसंगी केलेली भाषणं आहेत. 'कोसला' आणि 'रामनगरी' सारख्या माझ्या आवडत्या पुस्तकांबद्दल वाचून ती परत एकदा वाचायची इच्छा जागली, तशीच अनेक नवीन माहिती झालेली पुस्तकं गोळा करायची इच्छा देखील झाली. पण त्याहून महत्वाचं म्हणजे अनेक लेखातून, पत्रातून  पुलं स्वतःविषयी काही सांगतात. मुख्य मुद्दा म्हणून नव्हे, पण जे काही सांगायचं आहे त्याच्या अनुषंगाने. तसे ते त्यांच्या इतर पुस्तकातूनही भेटतातच, पण या पुस्तकातून थोडं जास्त, थोडं अधिक जवळून. आणि आपल्याला अजून काय पाहिजे! 

No comments: