चांगदेव पाटील तसा आपला जुना दोस्त. पांडुरंग सांगवीकर त्याच्याहून जुना, पण पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो काय म्हणतोय त्यातलं अर्ध-अधिक कळलंच नाही. परत एकदा, कॉलेजात आल्यावर सांगवीकर थोडाबहुत कळला. चांगदेव त्यामानाने समजायला सोपा. त्याचं जग, लहान गावातलं, शिक्षकी पेश्यातल्या व्यक्तींचं, माझ्या सर्वाधिक परिचयाचं म्हणून देखील हे
कदाचित असेल. किंवा त्याचे विचार, त्याची तडफड जाणवली, भिडली म्हणूनही कदाचित. पहाटेचे चार वाजले होते, मिट्ट काळोख तसा शहरात नसतो कधी, पण सामसूम होती. पुस्तक संपलं आणि गहिवरून आलं. आता जास्त सांगत नाही.
कदाचित असेल. किंवा त्याचे विचार, त्याची तडफड जाणवली, भिडली म्हणूनही कदाचित. पहाटेचे चार वाजले होते, मिट्ट काळोख तसा शहरात नसतो कधी, पण सामसूम होती. पुस्तक संपलं आणि गहिवरून आलं. आता जास्त सांगत नाही.